ड्रोन, क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टच्या पूर्व परवानगीशिवाय उड्डाणास पोलीस आयुक्तालय हद्दीत बंदी


 

ठाणेदि. 19 (जिमाका) :  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ नये. यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोननियंत्रीत क्षेपणास्त्रपॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास 23 जुलै ते 20 सप्टेंबर या कालावधीत बंदी घालण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.

            यासंबंधी डॉ. पठारे यांच्या स्वाक्षरीने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या आदेशानुसार, पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोननियंत्रीत क्षेपणास्त्रपॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास 60 दिवसांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ड्रोनद्वारे हवाई निगराणी करण्यास ठाणे शहर पोलीसांना परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात नमूद केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”