कल्याणमधील मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु



ठाणे, दि. 20 (जिमाका) : कल्याण येथील  मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात रिक्त असणाऱ्या जागांवर सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता शालेय (इ.10 वी ते 11 वी) व महाविद्यालय विभागातील विद्यार्थिनीना मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. तरी गरजू विद्यार्थिनींनी वसतिगृहात प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन वसतिगृह अधिक्षकांनी केले आहे. 

हे वसतिगृह कल्याणमधील पुष्पकथाम बिल्डींग, ए विंग, 1 ला माळा, बेतुरकरपाडा, कल्याण (प) येथे आहे. प्रवेश अर्ज वसतीगृह कार्यालयात मोफत उपलब्ध असून गरजू विद्यार्थिनींनी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा.


शासकीय वसतिगृह प्रवेशाकरीता अर्ज भरण्याचा कालावधी खालील प्रमाणे आहे.

इयत्ता 10 वी व 11 वी नंतरचे अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनींनी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) वसतिगृह प्रवेशाकरीता दि. 30 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे.

इयत्ता 12 वी  नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थींनींनी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशाकरीता दि. 24 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करावे.

व्यावसायिक अभ्यासक्रम घेतलेल्या विद्यार्थींनींनी दि. 24 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करावे.

वसतिगृहामार्फत निवासाची व जेवणाची मोफत सोय, सकाळी नाश्ता / दुध /फळ/अंडी दिले जाते. नियमानुसार आवश्यक शैक्षणिक साहित्य खर्च/प्रकल्प खर्च/ गणवेश खर्च देण्यात येतो. दरमहा रु.500/- निर्वाहभत्ता देण्यात येतो. या सर्व सुविधा विद्यार्थिनींना विनामूल्य दिल्या जातात. 


वसतिगृह प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला सन 2021-2022,  गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधारकार्ड, व रहिवासी दाखला अर्जासोबत जोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न