ठाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण विशेष सत्राचे आयोजन अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतला बुस्टर डोस

ठाणे, दि. २५ (जिमाका): जिल्हा परिषद ठाणे येथे आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी बुस्टर डोस घेतला.


पहिला आणि दुसरा डोस व बुस्टर डोस करीता पात्र असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष सत्रात लसीकरण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या संकल्पनेतुन हे विशेष सत्र घेण्यात आले. यावेळी सुमारे १५३ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. सर्व जिल्हा परिषद कर्मचारी तसेच ठाणे जिल्ह्यातील लसीकरणास पात्र सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन यावेळी अध्यक्षा श्रीमती पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न