सैनिकी मुलांचे वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज करण्यास १९ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
ठाणे, दि. २6 (जिमाका) : ठाणेमधील नौपाडा (पश्चिम) येथील सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये माजी सैनिक, सेवारत सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, युद्ध विधवा यांच्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येते. या वसतीगृहामध्ये प्रवेश अर्जासाठी 19 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) प्रांजल जाधव यांनी केले आहे.
नौपाडा येथील धरमवीर नगर, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे सैनिकी मुलांचे वसतीगृह आहे. या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी विविध महाविद्यालयात इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक विद्यालयामध्ये शिकत असलेल्या माजी सैनिकांच्या मुलांकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून परिपूर्ण अर्ज दि.22 जुलै 2022 पर्यंत मागविण्यात आले होते. मात्र, निकाल उशीरा लागल्यामुळे प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली असून आता 19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज जमा केले आहेत, त्यांनी पालकांसह दि.26 ऑगस्ट 2022 रोजी प्रवेश प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मेजर श्री. जाधव यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सैनिकी मुलांचे वसतिगृह, ज्ञानसाधना कॉलेजमागे, धरवीर नगर, नौपाडा, ठाणे पश्चिम या ठिकाणी तसेच मो. क्र. 9769664830 या क्रमांकावर संपर्क करण्यात यावे, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.
Comments
Post a Comment