इतर मागास प्रवर्गातील गरजू व्यक्तींनी शामराव पेजे महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

 

ठाणे, दि. 26 (जिमाका) :- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फेत थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना व बीज भांडवल योजना अशा विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. इतर मागास प्रवर्गातील जास्तीत जास्त तरुणांनी या योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. ही महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची कोकण विभागासाठीची उपकंपनी आहे. हे महामंडळ हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून हे महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गांतील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. व्याज परतावा योजनेमध्ये बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज १२ टक्के पर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येते. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँका तसेच सहकारी बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे. महामंडळाच्या मुख्यालयाकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यास एकूण ४ कोटी २७ लाख ९६ हजार इतक्या रक्कमेची एकूण ३०८ प्रकरणांचे उद्दिष्टे प्राप्त झाली आहेत. इतर मागास प्रवर्गामधील गरजू व्यक्तींनी या कर्ज योजनांसाठी ऑनलाईन अर्ज www.msobefdc.org/msobcfdc.in  या संकेतस्थळावर करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयएमएमआरडीए पुनर्वसन बिल्डींग नं . ए-१/७सिध्दार्थ नगर, चिंधी बाजाराजवळ, कोपरी ठाणे (पू) ४००६०३ संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न