ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन
ठाणे, दि. २6 (जिमाका) : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज 23 व्या कारगिल विजय दिना निमित्ताने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शहिदांना अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, तहसिलदार (महसूल) राजेंद्र चव्हाण, तहसिलदार (सामान्य प्रशासन) राजाराम तवटे, तहसिलदार राहुल सारंग व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव(निवृत्त) यांनी शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
000000
Comments
Post a Comment