अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
ठाणे, दि. 8 (जिमाका) : - ठाणे येथील कुंजविहार समोरील सॅटीस ब्रिजवर, ठाणे रेल्वे स्टशन येथे बेशुध्द अवस्थेत अनोळखी इसम आढळल्याने त्यास औषधोपचारासाठी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात आणले असता दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यु झाल्याची नोंद ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मयत अनोळखी इसमाचे वर्णन असे :- अंदाजे वय 40 वर्षे, रंग सावळा, उंची 4 फुट 9 इंच, बांधा सडपातळ, नाक चपटे, चेहरा गोल, डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले, दाढी व मिशी वाढलेली , अंगात निळ्या रंगाचा त्या पांढऱ्या रेषा असलेला शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे.
सदर मयत अनोळखी इसमाचे जर कोणी वारस किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर पोलीस स्टेशन, ठाणे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment