भातसा धरणाची पाणी पातळी १३४ मीटर सापगाव व नदीकाठावरील नागरीकांना सतर्कतेच्या सूचना
ठाणे दि. 15(जिमाका) :- आज सायंकाळी ५.०० वाजता भातसा धरणाची पाणी पातळी १३४. ०८ मी. एवढी असून भातसा धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा थोडा वाढला आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करणेसाठी, भातसा धरणाची वक्रद्वारे येणाऱ्या काही दिवसात उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामस्वरूप भातसा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग प्रवाहीत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भातसा नदीच्या काठावरील विशेषतः शहापूर- मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment