पशुपक्षास खाण्यासाठी योग्य तांदूळाच्या विक्रीसाठी आवाहन
ठाणे दि. 26(जिमाका) :- शिधावाटप दुकान क्र. 36 फ 18मधील 645 कि.ग्रॅ. तांदूळ खराब झाल्याने ते पशुखाद्य म्हणून विक्री करण्यात येणार आहे. हे तांदुळ घेऊ इच्छिणाऱ्या संस्था,संघटना अथवा व्यक्तिंनी 30 जुलैपर्यंत आपल्या निविदी शिधावाटप कार्यालयात पाठविण्याचे आवाहन शिधावाटप अधिकारी एस.आर. चव्हाण यांनी केले आहे.
शिधा वाटप दुकान क्र. 36 फ 18 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील 645 कि.ग्रॅ. तांदूळ खराब झाल्याचे प्रयोगशाळा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून हे तांदूळ पशुपक्षास खाण्यास योग्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे हे खराब झालेले तांदूळ लिलाव पद्धतीने पशुखाद्य म्हणून विक्री करण्यात येणार आहे. ज्या संस्था व्यक्ती सदर तांदूळ विकत घेण्यास इच्छुक असतील त्यांनी या मालाची दि. 28 जुलै 2022 पर्यंत अधिकृत शिधावाटप दुकान क्र. 36 फ 18 पोलिस लाईन ठाणे (पूर्व) या ठिकाणी जावून पाहणी करु शकतील. तसेच तपासणी नमुना शिधावाटप अधिकारी, 36 फ ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्ट नाका, ठाणे (पू) येथे उपलब्ध असून शिधावाटप अधिकारी यांचेशी संपर्क करू शकता. खरेदी करू इच्छिणाऱ्या संस्थांनी दि.30 जुलै 2022 पर्यंत आपल्या निविदा या कार्यालयाच्या पत्त्यावर पाठविण्यात याव्यात. उशिरा प्राप्त निविदांचा कोणत्याही परिस्थितीत विचार करता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे शिधावाटप अधिकारी एस.आर.चव्हाण यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment