अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला


ठाणे, दि. 20 (जिमाका) : - ठाणे येथील सॅटीस ब्रिजखाली पायऱ्यांच्या फुटपाथवर, ठाणे रेल्वे स्टशन येथे बेशुध्द अवस्थेत अनोळखी इसम आढळल्याने त्यास औषधोपचारासाठी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात आणले असता दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यु झाल्याची नोंद ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

            मयत अनोळखी इसमाचे वर्णन असे :-  अंदाजे वय 50 ते 55 वर्षे, रंग सावळा, उंची 5 फुट 1 इंच, बांधा सडपातळ, नाक सरळ, डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले, दाढी व मिशी वाढलेली , अंगात काळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे.

सदर मयत अनोळखी इसमाचे जर कोणी वारस किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी ठाणे नगर पोलीस   ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर पोलीस स्टेशन, ठाणे  यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”