महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम, २०२२ बाबत हरकती/सूचना पाठविण्याचे आवाहन

ठाणे दि. 26 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाचे अंतर्गत महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम, २०२२ चा मसुदा महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दि. १८ जुलै २०२२ रोजी अधिसुचनाव्दारे प्रसिध्द केले आहे. सदर अधिसुचनेव्दारे प्रसिध्द केलेल्या मसुद्यांबाबत ४५ दिवसांचे आत हरकती / सुचना मागविण्यात येत आहेतअसे कामगार उपायुक्त संतोष भोसले यांनी कळविले आहे.

            हा मसूदा  www.maharashtra.gov.in आणि www.mahakamagar.maharashtra.gov.in या राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कायदे व नियम या पर्यायाखाली प्रसिध्द करण्यात आल्या आहे.

           महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम २०२२ चा कामगार नियम प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास त्याकामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, ४ था मजला, सी २०, ई ब्लॉक, बांद्रा संकुल, वांद्रे (पूर्व) मुंबई ४०० ०५१ येथे किंवा mahalabourcommr@gmail.com  या ईमेलवर स्विकारण्यात येणार आहेत. सदर कालावधी समाप्त होण्यापूर्वी, उपरोक्त प्रारूपाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संघटनेकडून जे प्राप्त होतील असे आक्षेप किंवा सूचना, राज्य शासनाकडून विचारात घेण्यात येतील, याची नोंद घ्यावीअसे कामगार उपायुक्त श्री. भोसले यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन