आरटीईअंतर्गत चौथ्या प्रतिक्षायादीतील बालकांचे प्रवेश २७ जुलैपर्यंत घेण्याचे आवाहन

 

ठाणेदि. २6(जिमाका) : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) वंचित गटातील व दुर्बल घटकांतील २५ टक्के जागांसाठी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठीच्या चौथ्या टप्प्याच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली असून चौथ्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी २७ जुलैपर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.

वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ. 1 ली ते 8 वी पर्यंतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे. यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सन 2022-23 ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात आर.टी.ई. 25% प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीमधील चौथ्या प्रतिक्षायादीत जिल्ह्यातील एकूण 125 अर्जांची निवड झाली आहे. या प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दि. 27 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रतिक्षा यादीतील बालकांचे प्रवेश घेण्यासाठी पालकांनी यादी नाव आल्याच्या पत्राची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका /महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन डॉ. कारेकर यांनी केले आहे.

प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर लघुसंदेश प्राप्त झाले असतीलपरंतु फक्त या संदेशावर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावरील अर्जाची स्थिती या ठिकाणी अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी. प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. कारेकर यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न