ठाणे येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे, दि.6 (जिमाका) : ठाणे मधील कोठारी कंपाऊंड येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थींनीनी अर्ज करावे, असे आवाहन वसतीगृहाच्यावतीने करण्यात आले आहे. मागासवर्गीय मुलींचे हे वसतिगृह कोठारी कंपाऊंड, टिकुजिनिवाडी समोर, चितळसर, मानपाडा, घोडबंदररोड, ठाणे पश्चिम येथे आहे. या वसतिगृहात इयत्ता 8 वी पासून पुढील वर्गात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थिंनींना सन 2022-23 करीता प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यानींनी कार्यालयीन वेळेत उपरोक्त पत्यावर संपर्क साधावा, असे मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहच्या गृहपालांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment