कौटुंबिक न्यायालय, बेलापूर येथे दि.01 फेब्रुवारी रोजी “सुकून प्रकल्प” सेंटरचे उद्घाटन
ठाणे,दि.30(जिमाका):- कौटुंबिक न्यायालय, बेलापूर येथे दि.01 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता “सुकून प्रकल्प” सेंटरचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तरी, या कार्यक्रमाकरिता इच्छुक नागरिकांनी, विधी व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन बेलापूर नवी मुंबई वकील संघाचे अध्यक्ष ॲड.सुनिल मोकल आणि कौटुंबिक न्यायालय, बेलापूरच्या न्यायाधीश डॉ.रचना तेहरा यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment