ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता दि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

ठाणे,दि.27(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि सिध्दार्थ ओवळेकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.08 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता न्यु हॉरिझन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट, आनंद नगर, ठाणे (प.) येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात एस.एस.सी, एच.एस.सी, पदवीधर, आय.टी.आय / डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तरी सर्व नोकरी इच्छूक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती संध्या साळुंखे केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न