रबाळे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता दि.29 जानेवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

ठाणे,दि.27(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे/ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, मेट्टा ग्लोबल फाऊंडेशन व नेशन बिल्डर डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि.29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, पी-14, एस.आय.डी.सी, रबाळे रेल्वे स्टेशन शेजारी, ठाणे बेलापूर रोड, रबाळे, नवी मुंबई येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात एस.एस.सी, एच.एस.सी, पदवीधर, आय.टी.आय / डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तरी सर्व नोकरी इच्छूक उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती संध्या साळुंखे केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट