कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सध्याच्या सोडत पध्दतीबाबत शेतकऱ्यांचे अभिप्राय नोंदविण्याबाबत कृषी विभागानी केले आवाहन

 

ठाणे,दि.28(जिमाका):- सन 2020 पासून कृषी यांत्रिकीकरण योजना महाडिबीटीवर ऑनलाईन अर्ज करुन सोडत काढून राबविण्यात येते. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविताना शेतकरी बंधूनी अर्ज दाखल केल्यानंतर लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येते. महाडिबीटी प्रणालीवर योजना सुरु होवून 4 वर्षांचा कालावधी झाला आहे. ही प्रचलित ऑनलाईन सोडत पध्दत योग्य आहे किंवा कसे याबाबत शेतकरी बांधवांची मते जाणून घेण्यासाठी कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना महाडिबीटी प्रणाली सोडत पध्दतीबाबत पुढीलप्रमाणे शेतकरी प्रतिक्रिया देण्यात याव्यात:-

1. सध्याची सोडत पध्दत योग्य आहे का? होय / नाही

2. या व्यतिरिक्त सोडत पध्दत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पध्दतीची असावी असे वाटते का? होय / नाही

प्रचलित सोडत पध्दत व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यापैकी कोणती सोडत पध्दत प्राधान्याने राबवावी, याबाबतचा अभिप्राय……………….

3. याबाबत आपले काही नवीन अभिप्राय असल्यास.

कृषी यांत्रिकीकरण सोडत पध्दतीबाबत वरीलप्रमाणे आपले म्हणणे/सूचना/मते नजिकच्या कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी/ तालुका कृषी अधिकारी कार्यालयात नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ