महाराष्ट्रातील पहिल्या जलशक्ती केंद्राचे उद्घाटन संपन्न
ठाणे,दि.29(जिमाका):- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जलमिशन अंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या व भारतीय जैन संघटना (बीजीएस) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री संजय राठोड, जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील यांच्या निर्देशानुसार व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता तथा अप्पर आयुक्त प्रादेशिक क्षेत्र, पुणे सुनिल कुशिरे व ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक जलसंधारण अधिकारी सुरज शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या जलशक्ती केंद्राचे उद्घाटन कळवा, ठाणे येथे संपन्न झाले.
हे जलशक्ती केंद्र पाण्याच्या संबधित माहिती जलसंधारणाची तंत्रे पाण्याची गुणवत्ता, पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी संसाधन आणि ज्ञान केंद्रे म्हणून काम करतील आणि याबाबत स्थानिक लोकांना पाण्याशी संबंधित सर्व उपक्रमावर तांत्रिक मार्गदर्शन करतील, असे जलशक्ती केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी सूरज शिंदे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा जलसंधारण अधिकारी फरीद खान, उपविभागीय जलसंधारण अधिकारी संजय कचरे, अरुण बडगुजर, शितल यादव, सायली दौडे, कोमल निंबाळकर, सनी बारस्कर, वैभव मसवडकर, कोमल आंधळे, सतिश उपर्वट, दिलीप चंदनशिवे, वामन वरेकर, शंकर जाधव, प्रतिक्षा विशे, मनोज पाटील, प्रकाश चित्ते, राकेश गोवारी, चिंधु राणे, संजय शेलार, चैतन्य साळवे, हर्षदा नलावडे, शंशाक यशवंतराव, तुषार सोनावणे, योगेश पाटील, इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment