स्पर्श पोर्टलसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर्स स्थापन करण्याकरिता इच्छुक माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी
ठाणे,दि.30(जिमाका):- केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत राज्यातील राज्य सैनिक बोर्ड/जिल्हा सैनिक बोर्ड या ठिकाणी माजी सैनिकांना स्पर्श प्रणालीत (Sparsh Portal) येत असलेल्या अडचणींसाठी CSC (Common Service Centres) स्थापन करण्याबाबत कळविले आहे.
कॉमन सर्व्हिस सेंटर चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी सैनिकांना डीजीआरद्वारे मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्या माजी सैनिकांना CSC केंद्र स्थापन करावयाचे आहे, त्यांनी डीजीआरच्या http://dgrindia.gov.in या संकेतस्थ्ळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
तरी, ठाणे व पालघर जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी आपले नाव त्वरीत वरील संकेतस्थळावर नोंद करून या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ठाणे/पालघर मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment