जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण संपन्न

 

ठाणे, दि.26 (जिमाका):- 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे, महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्केपाटील, मल्लिकार्जून माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे, जिल्हा हिवताप अधिकारी संतोषी शिंदे, तहसिलदार डॉ.आसावरी संसारे, संदीप थोरात, रेवण लेंभे, उज्वला भगत, उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, राहुल सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता कल्याणी पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट