ऑटोरिक्षा चालकांविरुध्द ऑनलाईन तक्रारीकरिता व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध

 

ठाणे,दि.29(जिमाका):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयाने ऑटोरिक्षा चालकाद्वारे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून जादा भाडे आकारणी, जादा प्रवासी वाहून नेणे, भाडे नाकारणे, प्रवाशांसी उध्दट वर्तन करणे, शिवागाळ करणे इ. गुन्ह्यांकरिता ऑटोरिक्षा प्रवाशांसाठी ऑनलाईन तक्रार करण्यासाठी मोबाईल क्र. 9423448824 (Whatsapp) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ऑटोरिक्षा चालकाने कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा केल्यास प्रवाशाने ठिकाण, दिनांक, वेळ व गुन्ह्याचे स्वरुप, फोटो इ. तपशिलासह वरीलप्रमाणे नमूद व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार दाखल करावी. या तक्रारीची दखल घेवून ऑटोरिक्षा चालकावर मोटार वाहन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट