महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या अंतिम सुधारित उत्तरसूचीबाबत आक्षेप असल्यास दि.10 फेब्रुवारी पर्यंत नोंदवावा
ठाणे,दि.07(जिमाका
:- महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र
शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2024 पेपर (इ. 1 ली ते 5 वी) पेपर ।। (इ. 6 वी ते
8 वी) चा अंतरिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर दि.31 जानेवारी
2025 रोजी जाहीर करण्यात आला होता व या अंतरिम निकालावर दि.06 फेब्रुवारी 2025 पर्यंत
गुणपडताळणी व आक्षेप मागविलेले होते.
त्यानुसार दि. 10 जानेवारी 2025 रोजी
प्रसिद्ध झालेल्या अंतिम उत्तरसूचीवर प्राप्त हरकतीनुसार पेपर ।। मधील गणित विज्ञान
विषयातील प्रश्नक्रमांक संच A-130,
B-125,
C-150 व D -145 बाबत
आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार हा प्रश्न रद्द करण्यात येऊन
अंतिम सुधारित उत्तरसूची जाहीर करण्यात येत आहे. याबाबतही कोणाचा आक्षेप असेल तर दि.10
फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत mahatet24msce@gmail.com या ई-मेल वर आक्षेप नोंदविता येतील. वरील कालावधीनंतर
प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही व तद्नंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल,
असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
0000000000
Comments
Post a Comment