प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 19 व्या हफ्त्त्याचे 24 फेब्रुवारी रोजी होणार वितरण
ठाणे,दि.22(जिमाका)
:- पी.एम.
किसान योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी 2025 रोजी
दु.2.00 ते 3.00 या वेळेत 19 व्या हफ्त्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
बिहार राज्यातील
भागलपूर येथे किसान सन्मान समारोह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे
थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
या ऑनलाईन समारंभामध्ये सर्व खासदार व आमदार
उपस्थित राहणार आहेत. प्रगतीशील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या
माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
मंत्री (कृषी), महाराष्ट्र राज्य यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्री महोदयांनीही
या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
देखील सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभाग, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने
यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment