सन 2024-25 या वर्षामध्ये निर्यातक्षम आंबा पिकांची मॅगोनेट प्रणालीद्वारे शेत नोंदणी दि.28 फेब्रुवारी पर्यंत करावी


ठाणे,दि.25(जिमाका):- युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मॅगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन 2024-25 मध्ये आज अखेर महाराष्ट्र राज्यातून 9 हजार 459 निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. तर कोकण विभागातून 3 हजार 919 निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागाची मॅगोनेट या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याची अंतिम दि.31 डिसेंबर 2024 होती. परंतू अपेडा, नवी दिल्ली कार्यालयाकडे विनंती करून ही मुदत दि.28 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात यावी.

निर्यातक्षम आंबा फळबागेत राबवायच्या योग्य कृषी पद्धती (Good Agriculture Practices) राबविणे आवश्यक आहे. युरोपीय युनियन व अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय / शेतकरी स्तरावर ठेवायचे दस्तऐवजचे विहित प्रपत्रात जतन करण्यात यावे. याबाबतच्या सूचना आयुक्तालयाचे दि.6 जून 2024 व दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्राने देण्यात आल्या आहेत. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात (प्रपत्र -1) अर्ज दाखल करावा. (कागदपत्रे अर्ज, 7/12, 8अ आधार कार्ड) त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यामार्फत (कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी) क्षेत्राची तपासणी करून प्रपत्र 4 अ मध्ये अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सादर केला जातो. त्यानंतर 2 व प्रपत्रात नोंदणी प्रमाणपत्र अदा केले जाते. शेतकऱ्यांनी पिक संरक्षणाच्या दृष्टीने शेतात राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या बाबींच्या नोंदी प्रपत्रक मध्ये नोंदी वेळेत घेणे आवश्यक आहे.

सर्व आंबा बागायतदारांनी सन 2024-25 मध्ये चालू हंगामाकरीता नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून मॅगोनेटद्वारे नोंदणीसाठी त्वरीत अर्ज करावेत. प्रथम नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, 7/12, 8अ, बागेचा नकाशा व आधार कार्ड इत्यादि कागदपत्राची आवश्यकता आहे. मॅगोनेटद्वारे नोंदणी करण्याची वाढीव व अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी 2025 अशी आहे. निर्यातक्षम आंबा बागांची वेळेत नोंदणी करण्याकरिता संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी करावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे अंकुश माने यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ