ठाणे येथे 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा, 2025 चे दि.22 फेब्रुवारी ते दि.1 मार्च 2025 या कालावधीत आयोजन
ठाणे,दि.25(जिमाका):- ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन दि.22 फेब्रुवारी ते दि.1 मार्च 2025 या कालावधीत करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, तायक्वांदो, दु-शु, ज्युदो, कुस्ती, बॉक्सींग, हॉकी, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डिंग, क्रॉसकंट्री व जलतरण अशा 18 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकुण 13 संघ सहभागी झाले असून त्यात 2 हजार 323 पुरुष व 606 महिला खेळाडू असे एकूण 2 हजार 929 खेळाडूंनी भाग घेतला आहे. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था एम.एम.आर.डी.ए. क्वॉटर्स, भाईंदरपाडा येथे करण्यात आली असून त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
ही स्पर्धा साकेत पोलीस परेड ग्राऊंड, मुख्यालय येथील जुने परेड ग्राऊंड, साकेत येथील हेलीपॅड, सिध्दी हॉल व रहेजा गार्डन ठाणे स्पोर्ट क्लब येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेचे साखळी सामने दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी पासुन सुरू झाले असून, आजतागयत हॉकी (पुरूष), फुटबॉल (पुरूष), खो-खो (महिला व पुरुष), कबड्डी (महिला व पुरूष), रेसलिंग (महिला व पुरूष), बॉक्सींग (महिला व पुरुष), तायक्वांदो (महिला व पुरुष), पॉवर लिफ्टींग (महिला व पुरूष), व्हॉलीबॉल (महिला व पुरुष) असे साखळी सामने झाले असून या खेळांचे अंतिम सामने होणे बाकी आहे. या व्यतिरिक्त उर्वरित खेळ दि.25 फेब्रुवारी 2025 रोजी पासून सुरू झाले आहेत.
या स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाद्वारे क्रीडा रसिकांना स्पर्धेचा आनंद घेता यावा यासाठी https://youtube.com/@
या स्पर्धेचे उद्घाटन दि.27 फेब्रुवरी 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून स्पर्धेची सांगता/समारोप दि.1 मार्च 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या प्रमुख, पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला तसेच इतर मान्यवर हजर राहणार आहेत.
तरी, जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधी व क्रीडा रसिकांनी सहभागी खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी या स्पर्धेस उपस्थित राहावे, असे आवाहन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.
00000

Comments
Post a Comment