एसटी कर्मचाऱ्यांनी " प्रवासी सेवा हिचं ईश्वर सेवा " समजून काम करावे..! - उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा मौलिक सल्ला
ठाणे,दि.09(जिमाका
:- एसटीच्या
पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी
" प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!" समजून काम केले पाहिजे. त्यांच्या
आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री
श्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक -वाहक
विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळयाच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन
मंत्री श्री. प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री श्री.प्रकाश आबिटकर अर्थ व नियोजन राज्यमंत्री
आशिष जयस्वाल यांच्यासह एस. टी. महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
विवेक भीमनराव हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटीचा
चेहरा -मोहरा बदलून " फाईव्ह स्टार " परिवहन सेवा निर्माण करणे हे आपल्या
शासनासमोरील प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्ट सारखी बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी
खाजगी- सार्वजनिक भागीदारीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळाने भर दिला
पाहिजे. मागील वर्षी महाराष्ट्र औद्योगिक
विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून ५०० कोटी रुपये खर्चून एसटीच्या १९१ बसस्थानक
परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम आपण हाती घेतल्या असून " खड्डेमुक्त बसस्थानक
" हा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटीच्या चालक
वाहकांना आपले कर्तव्य करून आल्यानंतर ताण-तणाव मुक्त झोप मिळावी यासाठी प्रत्येक आगारांमध्ये
वातानुकूलित, स्वच्छ व टापटीप असे विश्रांतीगृह निर्माण करण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी एस टी प्रशासनाला दिले.
खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण केलेल्या विश्रांतीगृहाबाबत समाधान व्यक्त करून हे
" रोल मॉडेल " संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी
दिल्या.
यावेळी बोलताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले
की, एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यापुढे राज्यभरात
सार्वजनिक -खाजगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पामध्ये आगार तेथे १०० खाटांचे
कॅशलेस रुग्णालय उभारण्याच्या संकल्प असून माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
यांच्या वाढदिवसा दिनी या योजनेचा आम्ही शुभारंभ करीत आहोत. भविष्यात या रुग्णालयांमध्ये
शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबर
विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत एसटीच्या
कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या परिसरातील
प्रवासी व सर्वसामान्य जनतेला देखील मिळणार आहे.
यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी व प्रवासी उपस्थित
होते.
00000
Comments
Post a Comment