“आरटीई” प्रवेशासाठी पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये

कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास

संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई

-शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी

 


ठाणे,दि.06(जिमाका):- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार आरटीई 25 टक्के प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतुद आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी व प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे अवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी केले आहे.

अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी मनपा/नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे (depmh2@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे (educommoffice@gmail.com) यांच्याकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदवावी. तथापि, असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका 4.4अ, 10 व 11 संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न