गिग / प्लॅटफॉर्म कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी मोहीम सुरु
ठाणे,दि.27(जिमाका):- झोमॅटो, स्वीगी, ओला, उबेर, ब्लिंकिट व झेप्टो यासारख्या प्लॅटफॉर्मद्वारे काम करणाऱ्या गिग कामगारांमुळे भारतामध्ये तसेच जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. लाखो गिग कामगार उदा. डिलीवरी बॉय, रायडर, ड्रायव्हर या क्षेत्रात कार्यरत आहेत. अशा गिग कामगारांना त्यांच्या सुरक्षित भविष्याकरीता शासकीय योजनांचा लाभ मिळावा, म्हणून केंद्र शासनामार्फत गिग कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलद्वारे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांची नोंदणी केली जाणार असून त्यांच्या नोंदणीकरिता ई-श्रम पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नोंदणीकरिता गिग कामगारांनी http://register.eshram.gov.in/
तरी, सर्व प्लॅटफॉर्म / गिग कामगारांना ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी करावी. तसेच गिग कामगार काम करीत असलेल्या आस्थापना / अॅग्रीगेटर यांनीही आपली नोंदणी ई-श्रम पोर्टलवर करावी, असे आवाहन ठाणे कामगार उपायुक्त प्रमोद पवार यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment