बाल कल्याण समिती अध्यक्ष / सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत
ठाणे,दि.31( जिमाका):- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील प्रकरण ५ मधील कलम २७ तसेच
महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ मधील नियम १५ (१) मध्ये बाल कल्याण
समितीची स्थापना करण्याची तरतूद आहे, बाल
न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८
चा नियम ९० च्या अन्वये गठित केलेल्या निवड समितीच्या शिफारशीनुसार बाल कल्याण
समितीची स्थापना करण्यात येते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची
काळजी व संरक्षण) नियम, २०१८ च्या नियम ९१च्या अधिन राहून
महाराष्ट्र राज्यातील बाल कल्याण समिती मुंबई उपनगर-१ येथील ०१ अध्यक्ष व ०४ सदस्य
पदे तसेच कोल्हापूर येथील ०२ सदस्य, धुळे, यवतमाळ, सोलापूर
या जिल्ह्यांतील प्रत्येकी ०१ सदस्य पदे अशी एकूण १० पदे वगळून उर्वरित सर्व बाल
कल्याण समिती अध्यक्ष / सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले
आहेत.
वर नमूद केलेल्या पदांसाठी दिलेल्या अटीची
पूर्तता करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्ज वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तत्सम आवश्यक कागदपत्रांसह १५
दिवसांच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय दुसरा मजला, नियोजन भवन, जिल्हाधिकारी
कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे येथे सादर करावेत.
00000
Comments
Post a Comment