सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
ठाणे,दि.24(जिमाका):- जिल्हा न्यायालय, ठाणे आवारातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शनिवार, दि.26 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
हा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती शार्मिला देशमुख, न्यायमूर्ती गौरी गोडसे, न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे, न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे श्रीनिवास अग्रवाल यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, असे ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रशांत कदम व जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, ठाणे सुर्यकांत शिंदे यांनी कळविले आहे.
00000

Comments
Post a Comment