दि.28 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे “सेवा हक्क दिन” कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे,दि.24(जिमाका):- सामान्य प्रशासन विभागाच्या दि.01 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णय क्र.GAD/९४/२०२४-Lokshahidin अन्वये दि.28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. तसेच मुख्य आयुक्त राज्य सेवा हक्क आयोग, मुंबई यांच्या पत्रान्वये दि.28 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या अंमलबजावणीस दहा वर्ष पूर्ण होत असल्याने, या दशकपूर्तीचे औचित्य साधून जिल्हास्तरावर तसेच ग्रामपातळीवर विशेष उपक्रम राबविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

त्यानुषंगाने दि.28 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली पाचवा मजला, समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे सकाळी 11 वाजता सेवा हक्क दिवस निमित्ताने एकत्रित शपथ घ्यावयाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी दि.28 एप्रिल 2025 रोजी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) हरिश्चंद्र पाटील यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ