ठाणे जिल्हा प्रशासनातील 9 उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती

ठाण्याच्या अपर जिल्हाधिकारी पदी हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती

 

ठाणे,दि.28(जिमाका):- निवडसूची वर्ष 2024-25 मध्ये उपजिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 9 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

सह आयुक्त (पुनर्वसन), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे या रिक्त पदी श्री.विकास गजरे, अपर जिल्हाधिकारी, ठाणे या पदी श्री.हरिश्चंद्र पाटील, सह आयुक्त (पुनर्वसन), विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर या पदी श्री.संभाजी अडकुणे, अपर जिल्हाधिकारी, सातारा या पदी श्री.मल्लिकार्जुन माने, अपर जिल्हाधिकारी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., मुंबई या पदी श्री.इब्राहीम चौधरी, अपर जिल्हाधिकारी, महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या पदी श्रीमती सुचिता भिकाणे, व्यवस्थापकीय संचालक, रेशीम उद्योग महामंडळ, पुणे या पदी श्रीमती पद्मश्री बैनाडे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, अमरावती या पदी श्री.विठ्ठल इनामदार व सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, मुंबई या पदी श्री.विकास नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पदोन्नती मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ