महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
ठाणे,दि.29(जिमाका):- महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण गुरुवार, दि.01 मे 2025 रोजी पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे सकाळी 08 वाजता उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तरी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment