ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात “सेवा हक्क दिन” उत्साहात साजरा
ठाणे,दि.28(जिमाका:- शासनात सर्वत्र दि.28 एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची "दशकपूर्ती" आणि "प्रथम सेवा हक्क दिन” निमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “सेवा हक्क दिन” आज उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी “सेवा हक्क शपथ” घेतली तसेच सेवा हक्क दिन उपक्रमास दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिल्हा व तालुका पातळीवर विविध विशेष उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार सचिन चौधर, संदिप थोरात, रेवण लेंभे, अमोल कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, नायब तहसिलदार विठ्ठल दळवी, राहूल सूर्यवंशी, संतोष भोईर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक व ठाणे तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सध्या हजार पेक्षा जास्त सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. जवळपास 583 सेवा ऑनलाईन दिलेल्या आहेत. अजून 300 सेवा या ऑनलाईन आणायच्या आहेत तर 125 सेवा ऑनलाईन आहेत पण त्या कॉमन पोर्टलवर उपलब्ध नाहीत आणि म्हणून शासनाच्या सर्व विभागांना 15 ऑगस्ट पर्यंत सर्व सेवा ऑनलाईन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पद्मश्री शंकर महादेवन, सोनाली कुलकर्णी यांना घोषित करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment