ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आवारातील “टेरेस गार्डन”च्या निर्मिती उपक्रमाचे उद्घाटन संपन्न
ठाणे,दि.30(जिमाका):- ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या आवारात “टेरेस गार्डन” उपक्रमाची निर्मिती करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक स्व.पल्लवी सरोदे यांच्या स्मरणार्थ वॉटर लिली व कमळाचे रोप लावून करण्यात आली. याचा एक पुढील टप्पा म्हणून आज निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांच्या हस्ते “टेरेस गार्डन” उपक्रमाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार सचिन चौधर, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे, वृक्षतज्ञ विजयकुमार कट्टी, आसरा फाऊंडेशनचे मोहन शिरकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ठाणे जिल्हा समन्वयक शुभम महेंद्र शिंदे, स्नेहा एन्टरटेंमेंटचे अमन कोईरी, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी व आसरा फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.
यावेळी श्री.कट्टी यांनी वृक्षारोपणाचे महत्व, रोपांची निगा कशी राखावी त्याचबरोबर जुन्या जीन्स पॅन्ट्सपासून विविध प्रकारच्या टिकाऊ बॅग्ज निर्मितीबाबत उपस्थितांचे प्रबोधन केले.
00000


Comments
Post a Comment