महाराष्ट्र दिनी पोलीस पाटील गिरीधर पाटील यांचा राज्यपाल पुरस्काराने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मान
ठाणे,दि.29(जिमाका):- शासन निर्णयातील तरतूदीनुसार जिल्ह्यातील पोलीस पाटील यांना दरवर्षी राज्यपाल पुरस्कार प्रदान करण्यात येतो. विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार देण्याकरिता श्री.गिरीधर रघुनाथ पाटील, पोलीस पाटील, वळगांव, ता.भिवंडी यांच्या नावाची जिल्हा निवड समितीने एकमताने निवड केली आहे.
त्यानुषंगाने दि.1 मे 2025 रोजी श्री.गिरीधर रघुनाथ पाटील, पोलीस पाटील यांना ठाणे जिल्ह्याच्या महाराष्ट्र दिन मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment