पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना मृग बहार सन 2025
ठाणे, दि.29(जिमाका) :- पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना दि. 12 जून, 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत मृग व आंबिया बहारामध्ये अधिसूचित फळपिकांसाठी सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. मृग बहार सन 2025 मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष (क), चिकू, पेरु, सिताफळ व लिंबू या 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यामध्ये तर आंबिया बहार सन 2025-26 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.
दि. 11 एप्रिल, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये तसेच दि. 15 मे, 2025 रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पीकविमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दि. 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. तद्नुषंगाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन 2025-26 मध्ये या योजनेत सहभागी होण्याकरिता अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) अनिवार्य आहे.
तरी सर्व शेतकरी बांधवांनी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक तात्काळ काढून घेण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे. दि. 11 एप्रिल, 2025 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय, पुणे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी कळविले आहे.
00000000000
Comments
Post a Comment