खरीप 2025 हंगामासाठी अन्नधान्य व वाणिज्यिक पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत पिकांच्या अनुदानावरील प्रमाणित बियाण्यांकरिता अर्ज करावेत


 

ठाणे,दि.30(जिमाका):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान- अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित / संकरीत वाणांच्या प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांतर्गत प्रति शेतकरी आर्थिक सहाय्य किमान 0.20 हेक्टर ते कमाल 1 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे.

प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार असून सोयाबीन, भुईमुग, सुर्यफूल व तीळ या पिकांकरिता 100% अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याकरिता https://mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईटल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. या घटकाची प्रथम लाभार्थी निवड यादी दि.30 मे 2025 रोजी जाहीर करण्यात येईल.  

तसेच भात, तुर, मुग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, वरई या पिकांकरिता अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी 7/12 उताऱ्यासह कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला दाखवून अनुदान वजा जाता लोकवाटा भरुन प्रमाणित बियाणाचा लाभ घ्यावा. प्रमाणित बियाणे घटकास अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”