एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
ठाणे, दि.29(जिमाका) :- राज्यातील फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सन 2005-06 पासून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविण्यात आले. सन 2014-15 पासून “एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान” प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के असा सहभाग असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा व जीवनमान सुधारण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध उपघटकांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
उद्देश :-
1. वैविध्यपूर्ण कृषी हवामान विभागानुसार प्रादेशिक अनुकूलता व गरजा लक्षात घेऊन त्या त्या प्रदेशातील फलोद्यान क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान, प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा यांच्या माध्यमातून समूह पद्धतीने सर्वांगीण विकास करणे.
2. शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे व आहाराविषयी पोषण मूल्य वाढविणे.
3. आस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता आणणे.
4. पारंपारिक उत्पादन पध्दतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालून तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार आणि प्रचार करणे.
5. कुशल आणि अकुशल विशेषत: बेरोजगार तरुणांकरिता रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे.
या अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाबी
· दर्जेदार लागवड साहित्य निर्मिती
· नव्या फळबागांची लागवड
· जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
· सामूहिक सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शेततळे
· हरितगृह व शेडनेटद्वारे नियंत्रित शेती
· एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन
· काढणीपश्चात तंत्रज्ञान व प्रक्रिया
· शीतगृह
· पॅकहाऊस
· पणन व्यवस्थापन इत्यादींचा समावेश असून, मनुष्यबळ विकासावरही विशेष भर देण्यात आला आहे.
सन 2025-26 पासून राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात समाविष्ट नवीन घटक खालीलप्रमाणे आहेत.
· उच्च तंत्रज्ञान आधारित नर्सरी
· कमी खर्चाचे आळिंबी प्रकल्प
· औषधी व सुगंधी वनस्पती लागवड
· सौर उर्जेवर आधारित साठवण व वाळवण प्रकल्प
· संरक्षित शेती घटकांतर्गत तणरोधक मॅट, फ्रूट बॅग / कव्हर, हायड्रोपॉनिक्स इ. चा समावेश करण्यात आला आहे.
शासनाने अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.
या सर्व घटकांचा विचार करून महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळामार्फत "एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाची माहिती पुस्तिकेच्या" माध्यमातून आपल्या पुढे मांडण्यात येत आहे. या माहिती पुस्तिकेमध्ये अभियानातील सर्व घटक, मापदंड, सुधारणा व अर्ज प्रक्रिया यांचा समावेश करण्यात आलेला असून, अधिकाधिक शेतकरी बांधवांना याचा लाभ व्हावा, या उद्देशाने ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
“एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान माहिती पुस्तिकेचे अनावरण राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून "प्रथम अर्ज प्रथम लाभ" या तत्वावर निवड होण्यासाठी सर्व बंधू भगिनींना मोठ्या संख्येने अर्ज करून लाभ घेण्याचे तसेच या घटकांच्या अंमलबजावणी संदर्भात तसेच काही अडचणी असल्यास संबंधित गावाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment