राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण पौष्टिक तृणधान्य-उपअभियान (श्रीअन्न) अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण
ठाणे,दि.30(जिमाका):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान पौष्टिक तृणधान्य उपअभियान (श्रीअन्न) नाचणी प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांनी अर्ज करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
लाभार्थी निवड निकषः
प्रमाणित बियाणे वितरण या घटाकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी कमाल 1 हेक्टर पर्यंत मर्यादित आहे. या प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यास संबंधित बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकांमार्फत 7/12 उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCES) तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण संबंधित संस्थेनी करावे. नाचणी बियाण्याकरीता रु.3 हजार प्रति क्विंटल शासकीय अनुदान असून उर्वरित रक्कम लाभार्थी हिस्सा शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना द्यावा लागेल. 10 वर्षांच्या आतील अधिसूचित वाण प्रमाणित बियाणे वितरण अंतर्गत अनुदानास पात्र ठरतील. वितरकांनी दर्शनी भागावर अन्न आणि पोषण सुरक्षा कार्यक्रमातंर्गत प्रमाणित बियाणे अनुदानावर उपलब्ध असल्याचा फलक लावावा. संबंधित वितरकाने बियाण्याचे वाणनिहाय दर, अनुदान व अनुदान वजा जाता पॅकींगनिहाय येणारी किंमत याची माहिती फलकावर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. संबंधित वितरकानी अनुदान वजा जाता येणारी किंमत लाभार्थी शेतकऱ्यांकडून घेवून शेतकऱ्यांना बियाणे वितरीत करावे, शेतकऱ्यांकडून अनुदान वजा जाता वसूल केली जाणारी रक्कम कोणत्याही परीस्थितीत कृषी विभागामार्फत वसूल केली जाणार नाही. लाभाच्या हिश्श्याची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार संस्था व वितरकांची राहील.
विहित केलेल्या प्रमाणानुसार अनु. जाती 12 टक्के, अनु. जमाती 9 टक्के व सर्वसाधारण प्रवर्गासाठी 79 टक्के प्राधान्यक्रमाच्या लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ पोहचेल याकरीता प्रवर्गनिहाय लाभास प्राधान्य असेल. ठाणे जिल्ह्यामध्ये पौष्टिक तृणधान्य-उपभियान (श्रीअन्न): नाचणी अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत भौ, 130 क्विंटल व आर्थिक 3.90 लाख एवढा लक्षांक प्राप्त झालेला आहे. तरी, लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
00000

Comments
Post a Comment