ठाणे येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह आणि माजी सैनिक विश्रामगृह येथे कर्मचारी भरती


            ठाणे, दि.30 (जिमाका) :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे यांच्या आधिपत्याखालील धर्मवीरनगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथील  सैनिकी मुलांचे वसतिगृह, ठाणे आणि माजी सैनिक विश्रामगृह, ठाणे या दोन आस्थापनांवर शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी  माजी सैनिक प्रवर्गातून कर्मचारी भरती करण्यात येणार आहे.

                वसतिगृहासाठी भरण्यात येणारे पद :-  वसतिगृह अधीक्षक (पुरुष)  - 01 (माजी सैनिक JCO प्रवर्गातून),

निवासी ड्युटी, राहण्यास १ BHK निवासस्थान, वयोमर्यादा  - 35 ते 55 वर्ष, शैक्षणिक पात्रता  - किमान SSC पास

संगणक ज्ञान, दुचाकी चालक परवाना आवश्यक, एकत्रित मासिक मानधन - रुपये 31 हजार 875/-.

विश्रामगृहासाठी भरण्यात येणारे  पद :- स्वागत कक्ष सहायक  - 01 (माजी सैनिक प्रवर्गातून JCO उमेदवारास प्राधान्य), अनिवासी ड्युटी, वयोमर्यादा  - 35 ते 55 वर्ष, शैक्षणिक पात्रता  - किमान SSC पास, संगणक ज्ञान, दुचाकी चालक परवाना आवश्यक, एकत्रित मासिक मानधन - रुपये 24 हजार 875/-.      

या नियुक्ती कंत्राटी पद्धतीने अशासकीय संवर्गातून महाराष्ट्र शासन यांच्या सैनिक कल्याण विभाग, पुणे द्वारे वेळोवेळी निर्धारीत सेवा नियम तसेच एकत्रीत मानधनावर असतील. उमेदवारांनी अर्जासोबत माजी सैनिक ओळखपत्र, डिस्चार्ज बुक/सर्व्हिस पर्टीक्युलेर, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड, अनुभवाचा दाखला तसेच रहिवाशी पुरावा जोडणे बंधनकारक राहील.

अर्ज जमा करण्याचा पत्ता - 1) सैनिकी मुलांचे वसतिगृह ठाणे, धर्मवीरनगर, नौपाडा, ठाणे (प) - 400604 तसेच 2) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयठाणेरु.नं४०२कलेक्टर ऑफिस, कोर्ट नाकाठाणे ()-४००६०१अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 09 जून 2025 असून निवड प्रक्रिया बुधवार दि. 11 जून 2025 रोजी सकाळी 1100 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, ठाणे येथे घेण्यात येईलअधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक  मो.9769664830 (वसतिगृह), 9246624105(अधीक्षक). यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मे. प्रांजळ जाधव (नि.) यांनी कळविले आहे.

0000000000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”