जिल्हा क्रीडा पुरस्कार 2023-24 करिता अर्ज करण्यासाठी 5 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ

ठाणे,दि.30(जिमाका):- जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ठ खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना कार्यान्वित आहे. या पुरस्कारांतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे एकूण चार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्टनाका, ठाणे (प.) येथून प्राप्त करुन घ्यावेत. या पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज दि.30 जून 2025 पूर्वी अथवा पर्यंत आवश्यक कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथे बंद लिफाफ्यात सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.

तथापि, जिल्ह्यातील अधिकाधिक गुणवंत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज करण्यासाठी संधी मिळावी, याकरिता दि.05 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्रमांक- 022 25368755) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”