आर्थिक वर्ष सन 2024-25 चे आयकर विवरणपत्र (फॉर्म क्र.16) निवृत्तीवेतनधारकांनी डाऊनलोड करावे -जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे

ठाणे,दि.26(जिमाका):- ठाणे जिल्हा कोषागाराकडून निवृत्ती वेतन घेणाऱ्या व आयकरास पात्र असलेल्या ज्या निवृत्तीवेतन धारकांचा आयकर कपात करण्यात आला आहे, त्यांचे विहीत नमुन्यातील सन 2024-25 या अर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्र (फॉर्म क्र.16) तयार असून हे आयकर विवरणपत्र निवृत्तीवेतन धारक https://topensionthane.blogspot.com/ या लिंकवरून डाऊनलोड करु शकतात.

फॉर्म क्र.16 डाऊनलोड करावयाची कार्यपद्धती:

Ø https://topensionthane.blogspot.com/ या संकेतस्थळावर जाणे.

Ø Home button वर क्लिक करणे.

Ø IPAN No. (LAAAAA1234A) टाकणे.

Ø Search button वर क्लिक करणे.

Ø FORM 16 PART A & PART B डाऊनलोड होईल.

तरी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”