विशेष लेख क्र.29 - विशेष मुलाखत - मागासवर्गीय घटकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी शासन करीत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद -डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त भाऊ दगडू कांबळे

 

महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारिरीक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी वगैरेंसाठी तसेच समाजकल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करावा, सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या समाजसेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरून सामाजिक उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत, यासाठी शासनाने सन 1971-72 पासून व्यक्तींसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार / समाजभूषण पुरस्कार योजना सुरु केली आहे. सन 1989 पासून संस्थांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी 51 व्यक्ती व 10 संस्थांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

तथापि, सन 2023-24 या केवळ एक वर्षासाठी 60 व्यक्ती व 10 संस्था असे एकूण 70 पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानुषंगाने सन 2023-24 या वर्षांकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या श्री.भाऊ दगडू कांबळे आणि श्रीमती वर्षा सुनिल लोखंडे यांना सन्मानित करण्यात आले. या दोहोंचेही हार्दिक अभिनंदन..!

या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी श्री.कांबळे यांची घेतलेली ही मुलाखत…

आम्हाला आपल्याविषयी थोडक्यात माहिती द्यावी..

मी भाऊ दगडू कांबळे, रा. शंकर पार्क बी 3/104 पारसिक नगर, खारेगाव, कळवा ठाणे - 400605, मूळ गाव- मु. पो. शिपोशी, ता. लांजा, जि. रत्नागिरी. माझे शिक्षण 10 पर्यंत झाले आहे. मी जी. पी. पारसिक बॅंक, कळवा येथे नोकरी केली असून सध्या मी सेवानिवृत्त आहे. सध्या माझी जागृती विद्यामंदिर गोवंडी, मुंबई-43, नालंदा शिक्षण प्रसारक मंडळ, कामराज नगर घाटकोपर, मुंबई ही स्वतःची शाळा आहे. तसेच इतरही सामाजिक कामात माझा सहभाग आहे. माझ्या कुटुंबात माझी पत्नी सौ.ज्योती भाऊ कांबळे, मुलगा डॉ.रोहन भाऊ कांबळे हे सदस्य आहेत. मी मुंबईत/ठाण्यात 1982 साली आलो. सामाजिक कार्याला मी 1984 पासून सुरुवात केली.

तुम्हाला काम करीत असताना आलेल्या अडचणींबद्दल आम्हाला सांगू शकता?

सामाजिक, सांस्कृतिक स्वरूपाचे काम, शैक्षणिक काम करीत असताना विभागातील विध्यार्थ्यांचे रजा घेऊन ॲडमिशन करणे, आजारी लोकांना रजा घेऊन रुग्णालयात घेऊन जाणे या गोष्टींमुळे बॅंकेत रजेवर असल्याने वरिष्ठांची बोलणीही ऐकायला लागायची.

या कार्यात तुम्हाला कोणाकोणाचे सहकार्य लाभले?

या कार्यात मला कै.शिवाजी सानप सर (वरिष्ठ मुख्याध्यापक), चिंतामणी तोंडवळकर, जगदीश पराडकर, शरद कांबळे, खैरनार गुरुजी, खेडेकर गुरूजी, दादा गावकर आदी व्यक्तींचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

सामाजिक कार्याबद्दल आपले विचार काय - सामाजिक कार्याबद्दल सामाजिकदृष्ट्या तरूण वयात उत्साह निर्माण होऊन सामाजिक कामात आवड निर्माण होत होती. आजही सामाजिक कामाची आवड आहे. आजच्या तरुणांनी देखील सामाजिक दायित्व म्हणून सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला हवे.

सामाजिक न्याय विभागाच्या कामाविषयी आपले मत काय - सामाजिक न्याय विभाग मागासवर्गीयांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून चांगले काम करीत आहे. मागासवर्गीय घटकांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी शासन करीत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.

यात आणखी काही सुधारणा आवश्यक आहेत का

या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे कार्यालयीन कामकाज, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनतेशी वागणूक, योजनांची व्यापक जनजागृती याविषयीचे प्रशिक्षण वेळोवेळी देणे अत्यंत आवश्यक आहे.

आजच्या युवकांना आपण काय सुचवाल - आजच्या तरुण युवकांनी वृक्षारोपण, रक्तदान, अवयवदान, ध्वजदिन निधी, स्वच्छता अभियान, देशभक्तीपर व सामाजिक उपक्रम यासारख्या अभियानांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सक्रिय सहभाग घ्यायला हवा.

 

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

ठाणे

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”