ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात 3 हजार 953 उपक्रम राबविल्याची प्रथमच नोंद
अॅप आधारित महाकृषी खरीप मोहिम यशस्वी
ठाणे,दि.30(जिमाका):- ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात कृषी विस्ताराची माहिती देण्यासाठी आत्तापर्यंत 3 हजार 953 उपक्रम पार पडले आहेत. या उपक्रमांची नोंद अक्षांश रेखांश छायाचित्रांसह प्रथमच अॅप मध्ये करण्यात आली आहे.
वर्षानुवर्षे खरीपाच्या मोहिमांचे नियोजन कागदोपत्री होते व त्या राबविल्याचे अहवाल गाव पातळीवरून येतात. त्यातून, अनेकदा मोहिम राबविली नसतानाही, अहवाल पाठविले जातात. त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यंदा प्रथमच कृषी आयुक्तालयाने राज्यभरातील क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांना “महाकृषी उपयोजन” हे ॲप उपलब्ध करून दिले. यातून जिल्ह्यात आजअखेर 22 योजना व कार्यक्रमाच्या नोंदी घेतल्या गेल्या. जिल्ह्यातील अधिकारी देखील क्षेत्रीय भेटीत कार्यक्रम घेतल्यावर त्यांची नोंद महाकृषी मध्ये करीत आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी सांगितले की, जिल्ह्यात महाकृषी खरीप मोहीम अॅप आधारित कामकाज करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी दोन महिने तयारी करण्यात आली. त्यामुळे क्षेत्रीय पातळीवर होणाऱ्या उपक्रमांची बिनचूक नोंद होवून कृषी विभागाचे काम गावपातळीपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे, या संकल्पनेमुळे कागदोपत्री वेगळ्या नोंदी किंवा अहवाल ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. आतापर्यंत ह्या खरीप हंगामात जिल्ह्यात 3 हजार 953 उपक्रम राबविल्याचे स्पष्ट झाले आहे.
खरीप हंगामात आत्तापर्यंत राबवविलेले उपक्रम:-
उपक्रमाचे नाव:- बीज प्रक्रिया मोहिम, एकूण संख्या -721, उपक्रमाचे नाव:- बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिके, एकूण संख्या - 563, उपक्रमाचे नाव:- डिजिटल शेतीशाळा, एकूण संख्या - 60, उपक्रमाचे नाव:- निविष्ठांचा योग्य वापर, एकूण संख्या - 247, उपक्रमाचे नाव:- जमीन सुपीकता व मृदा आरोग्य पत्रिका वाटप, एकूण संख्या - 95, उपक्रमाचे नाव:- गाव निहाय प्रशिक्षण वर्ग, एकूण संख्या - 321. उपक्रमाचे नाव:- कृषि तंत्रज्ञान माहिती पुरविणे, एकूण संख्या - 136, उपक्रमाचे नाव:- जलसंधारण माहिती, एकूण संख्या -46, उपक्रमाचे नाव:- ग्रामपंचयातीला माहिती देणे, एकूण संख्या - 87, उपक्रमाचे नाव:- खतांचा योग्य वापर, एकूण संख्या - 55, उपक्रमाचे नाव:- विकसित कृषी संकल्प अभियान, एकूण संख्या – 129, उपक्रमाचे नाव:- जैविक खतांचे उत्पादन, एकूण संख्या - 79, उपक्रमाचे नाव:- पीक स्पर्धा, एकूण संख्या - 54, उपक्रमाचे नाव:- फळबाग लागवड तंत्र, एकूण संख्या - 171, उपक्रमाचे नाव:- खरीपातील पिकांसाठी रोप वाटिका, एकूण संख्या - 422, उपक्रमाचे नाव:- कृषी व्यवसाय केंद्र स्थापना, एकूण संख्या -47, उपक्रमाचे नाव:- भात लागवड तंत्र / यांत्रिकीकरण मोहीम, एकूण संख्या -422, उपक्रमाचे नाव:- युरिया ब्रिकेटचा वापर, एकूण संख्या - 14, उपक्रमाचे नाव:- आमदारांसोबत बैठका, एकूण संख्या - 03, उपक्रमाचे नाव:- कृषी निविष्ठा विक्रेत्यांसोबत बैठका, एकूण संख्या - 03, उपक्रमाचे नाव:- व्हाटसअॅप ग्रुप, एकूण संख्या – 278, असे विविध उपक्रम जिल्ह्यात राबविल्याचे ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी कळविले आहे.
00000

Comments
Post a Comment