निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत कार्यशाळा संपन्न

          ठाणे,दि.27(जिमाका) :-  मा. महालेखापाल (ले. व ह.)- महाराष्ट्र-1, मुंबई आणि जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट जॉन द बॅप्टीस्ट हायस्कूल आणि ज्यू. कॉलेज, ठाणे, येथे आज आहरण व संवितरण अधिकारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता "पेन्शन अदालत" संपन्न झाली.

            यावेळी महालेखाकार कार्यालयातील वरिष्ठ लेखाधिकारी  किर्ती दुभाषी,  जया गोमेझ, सुशिस वाघमारे, सुपरवायझर क्रिष्णा कुमारी, सहायक सुपरवायझर संतोष केदारे,  अनिता कर्णिक, गीता पील्लई, वरिष्ठ लेखाधिकारी विश्राम राऊळ, अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) सुरेंद्र राऊत व सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी  किर्ती दुभाषी यांनी निवृत्ती वेतन धारकांसाठी दूरदृष्य प्रणालीवर महालेखापाल यांच्या साईटवर निवृत्ती वेतन  सोप्या भाषेत कसे सादर करावे याचे प्रझेंटेशनद्वारे दाखविण्यात आले. या प्रेझेंटेशनमध्ये सेवापुस्तकातील नोंदी , फॅमिली पेन्शन,तात्पुरती पेन्शन,जीपीएफ अंतिम,उपदान,एनपीएस किंवा डीसीपीएस प्रस्ताव उपदान  यासाठी लागणारी सेवार्थ प्रणालीद्वारे नमुना फॉर्म कसे भरावे यास निवृत्ती वेतन प्रस्ताव सादर करतांना जास्तीत जास्त आपल्याकडून त्रृटी येत असतात. यासाठी आज आम्ही ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन प्रस्ताव सादर करतांना अडचण ‍निर्माण होणार नाही.  यासाठी आज येथे कार्यशाळा घेत आहोत.

 आज उपस्थित आपण आहरण सवितंरण म्हणून व निवृत्ती वेतन काम करणारे कर्मचारी आपल्या कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रस्ताव बाबत काही शंका असल्यास आपणांस चर्चातात्मक प्रश्न उत्तरेद्वारे शंकाचे निराकरण  आज येथे केले.  याप्रसंगी निवृत्ती पेन्शनधारक डॉ.काळे पंचायत समिती कल्याण यांनी आपले शंकाचे निराकरण झाले म्हणून संबधितांचे यावेळी आभार मानले.  यावेळी आपली शंका बाबत फिडबॅक म्हणून लेखीस्वरुपात पाठवा आम्ही आपल्या शंका बाबत निराकरण करण्याचे प्रयत्न करु.  अशा प्रकारे दोन सत्रात ही कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) सुरेंद्र राऊत यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यशाळेची सांगता झाली.

000000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”