एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज घेण्यासाठी मोहीम सुरु
ठाणे,दि.26(जिमाका):- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 पासून “प्रथम अर्ज, प्रथम लाभ” या तत्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. यासदंर्भात क्षेत्रीयस्तरावर व्यापक प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) यशस्वी अंमलबजापणी होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासोबतच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी खरीप हंगाम लक्षात घेता दि.15ते 30 जून 2025 या कालावधीत क्षेत्रीय स्तरावर गावपातळीपर्यंत विशेष मोहीम राबविली जात आहे.
तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील इच्छुक शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीवर जास्तीत जास्त संख्येने https://mahadbt.maharashtra.
00000
Comments
Post a Comment