ऑटोरिक्षा चालकाद्वारे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून गुन्हा केल्यास ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध ऑनलाईन तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर

ठाणे,दि.25(जिमाका):- मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरण यांच्या दि.23 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीत ऑटोरिक्षाकरिता (सी.एन.जी.) 1.5 कि.मी. करिता किमान 26/-रु. प्रमाणे भाडेदरात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या मीटर भाडेदराच्या अनुषंगाने, या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेअर-ए-ऑटोरिक्षा मार्गावरील शेअर भाडेदराची गणना करून दिली आहे. त्यामुळे विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जादा भाड्याची मागणी करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांविरुद्ध ऑनलाईन तक्रार करण्यासाठी मोबाईल क्र.9423448824 (Whatsapp) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ऑटोरिक्षा चालकाद्वारे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करून जादा भाडे आकारणी, जादा प्रवासी वाहून नेणे, भाडे नाकारणे, प्रवाशांसी उद्धट वर्तन करणे, शिवीगाळ करणे इ. गुन्ह्यांकरिता ऑटोरिक्षा चालकाने कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा केल्यास प्रवाशाने ठिकाण, दिनांक, वेळ व गुन्ह्याचे स्वरुप, फोटो इ. तपशिलासह वरीलप्रमाणे नमूद व्हॉटसअॅप 9423448824 क्रमांकावर तक्रार दाखल करावी. त्या तक्रारीची दखल घेऊन ऑटोरिक्षा चालकावर मोटार वाहन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”