राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे,दि.26(जिमाका):- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्र.उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसिलदार (महसूल) रेवण लेंभे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments
Post a Comment