ठाणे जिल्ह्यातील रिक्त 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि.31 जुलै 2025 पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत
ठाणे,दि.03(जिमाका):- ठाणे जिल्ह्यात रिक्त असलेल्या एकूण 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून याकरिता दि.03 जुलै 2025 ते दि.31 जुलै 2025 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
याबाबतची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://thane.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात नमूद केलेल्या अटी व शर्तींचे पालन करुन विहित मुदतीत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन नायब तहसिलदार (सेतू) विठ्ठल दळवी यांनी केले आहे.
00000
VERY GOOD
ReplyDelete